Bank Locker कराराच्या स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांचा रांगा

मुंबई तक

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अनिवार्य असलेल्या बँक आणि ग्राहक यांच्यातील लॉकर ॲग्रिमेंटच्या स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु आहे. मुंबईसह राज्यात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. या अग्रिमेंटची मुदत ३१ डिसेंबर २०२२ होती. मात्र हे अॅग्रिमेंट करण्याचं काम अद्यापही सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी २०२३ पासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अनिवार्य असलेल्या बँक आणि ग्राहक यांच्यातील लॉकर ॲग्रिमेंटच्या स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु आहे. मुंबईसह राज्यात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये स्टॅम्प खरेदीसाठी ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत. या अग्रिमेंटची मुदत ३१ डिसेंबर २०२२ होती. मात्र हे अॅग्रिमेंट करण्याचं काम अद्यापही सुरुच असल्याची माहिती मिळत आहे.

रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी २०२३ पासून लॉकरच्या नियमात काही बदल केले आहेत. यानुसार बँक आणि ग्राहक यांच्या मॉडेल लॉकर अॅग्रिमेंट करण्यात येत आहे. हे ॲग्रिमेंट बँकानुसार वेगवेगळं असणार नाही, तर ‘आयबीए’ अर्थात इंडियन बँक असोसिएशनच्या मसुद्यानुसार सर्व बँकांसाठी एकच मसुदा राहणार आहे.

त्यामुळे लॉकर संदर्भात बँक स्वतः काही निर्णय घेऊ शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे. या अॅग्रिमेंटमधील अटी क्लिष्ट नसतील. कोणत्याही बँकेत नव्याने लॉकर घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आता या मसुद्यानुसार लॉकर ॲग्रीमेंट करावे लागणार आहे. तसंच आधीपासून लॉकर असलेल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत नवे करार करून घेण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.

नव्या लॉकर करारातील मुद्दे

हे वाचलं का?

    follow whatsapp