नागपुरात फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर; अमित शाहांचा फोटो गायब

मुंबई तक

योगेश पांडे नागपूर: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लागलेल्या या होर्डिंग वर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे

नागपूर: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे.

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लागलेल्या या होर्डिंग वर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नागपूरचे विधान परिषद सदस्य आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांचे फोटो आहेत परंतु या फोटोतून अमित शहा यांचा फोटो गायब असल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

चौकाचौकात फडणवीसांचे (Devendra Fadnavis) बॅनर

”प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार तुझ्यापुढे आम्ही खूप खुजे आहोत, तुला आमचा सलाम”, त्याचबरोबर ”देवेंद्रा तुझ्या त्यागाचे मोल मौल्यवान आहे. आपल्या गळ्यातील माळ एका क्षणात दुसऱ्याच्या गळ्यात घातली. आधी पक्ष आणि नंतर मी हे मूल्य तू खरे करुन दाखविले आहे”. अशा आशयाचे होर्डींग नागपुरात लागले आहेत. नागपुरातील विमानतळ परिसर, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौकात असे होर्डिंग लावण्यात आले आहे.

अमित शाहांचा (Amit Shah) आदेश आला अन् फडणवीस मुख्यमंत्री झाले

दरम्यान काल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केले, हे ऐकून राज्यातील जनतेला धक्का बसला. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरतो ना सावरतो तोच दुसरा धक्का महाराष्ट्राला बसला तो म्हणजे दिल्लीतून फडणवीसांना आदेश आला आणि मी सरकारमध्ये राहणार नाही म्हणणारे फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यामुळे स्वत: देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जवळचे लोक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात विविध पक्षातील लोक देवेंद्र फडणवीस यांचा गेम झाला म्हणत केंद्राकडे बोट दाखवत आहेत.

आज सकाळी भाजपच्यावतीने मुंबईमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रविण दरेकर अनुपस्थीत होते. त्यामुळे अजून चर्चाना उधाण आले होते. आता नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp