मुंबईच्या शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी रामदास कदमांनी ओकली- भास्कर जाधव

मुंबई तक

राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी सभा घेतली. त्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावरती जहरी टीका केली. आता त्याला शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव पत्रकार परिषदेमध्ये काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

रत्नागिरी: एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी सभा घेतली. त्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावरती जहरी टीका केली. आता त्याला शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भास्कर जाधव पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले?

”लोकशाहीमध्ये कोणी कुठे सभा घ्यावी याला आक्षेप नाही. रामदास कदम असे म्हणाले मी विनाय नातूंना निवडून आणणार. देशाच्या इतिहासात मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पराभूत झाल्याचा इतिहास आहे. परंतु राज्याचा विरोधी पक्ष नेत्याला पराभूत करण्याचा इतिहास भास्कर जाधवांनीच केला आहे. दुसऱ्या कोणासाठी भास्कर जाधवांना पराभूत करणे इतके सोपं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

पुढे भास्कर जाधव म्हणाले ”रामदास कदमांनी वापरेलेली भाषा अजून कुणी वापरेलेली नाही. जी भाषा रामदास कदमांनी वापरली जसं-जसं ते महाराष्ट्रात जातील, तसं तशी रामदास कदम यांची जोड्यांनी पुजा करतील. उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुंबईमध्ये शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांनी ओकली आहे.”

हे वाचलं का?