सर्वात मोठी बातमी: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा मोठा उलटफेर, शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव

राज्यसभा निवडणुकीत दिवसभरात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. ज्यानंतर पहाटे तीन वाजता राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पाहा नेमका निकाल काय आहे.
सर्वात मोठी बातमी: राज्यसभा निवडणुकीत 
भाजपचा मोठा उलटफेर, शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव
biggest news of rajya sabha election results announced see who has won

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची मतदानात दिवसभरातील चढ-उतारानंतरअखेर मध्यरात्री तीन वाजता पहिला निकाल हाती आला आहे. ज्यानुसार पहिल्या राऊंडमध्येच भाजपने दोन जागी बाजी मारली आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत. तर सहाव्या उमेदवाराच्या बाबतीत निकालात सगळ्यात मोठा उलटफेर यावेळी पाहायला मिळाला आहे. कारण या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी अनपेक्षितरित्या विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांनी धूळ चारत अत्यंत अटीतटीचा असा विजय मिळवला आहे.

शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात काँटे की टक्कर यावेळी पाहायला मिळाली होती.

पहिल्या राऊंडमधील मतांची आकडेवारी

  • भाजपचे उमेदवार पियुष गोयल विजयी (48 मतं)

  • भाजपचे उमेदवार अनिल बोंडे विजयी (48 मतं)

  • शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत विजयी (41 मतं)

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल विजयी (43 मतं)

  • काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगडी विजयी (44 मतं)

  • शिवसेनेचे संजय पवार यांना (33 मतं) (पहिल्या फेरीतील मतं)

  • भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (27 मतं) (पहिल्या फेरीतील मतं)

दुसरी फेरी

  • भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या फेरीअखेर 41.58 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.

  • शिवसेनेचे संजय पवार यांना दुसऱ्या फेरी अंती 39.26 मतं मिळाली ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

निवडणूक आयोगाने एक मत ठरवलं बाद

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला होता. ज्यानंतर अनेक तास निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि त्यात सविस्तर चर्चा केली. ज्यानंतर निवडणूक आयोगाने असा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतदानाची प्रक्रिया योग्यरित्या पार पाडली नाही असं सांगत त्यांचं मत रद्द ठरवलं. हे एक मत वगळून उर्वरित 284 मतांची मोजणी करण्याचे आदेश आयोगाने दिलं होते.

ज्यानंतर मतमोजणीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. कारण यावेळी मविआची सहा मतं फोडण्यात भाजपला यश आलं आणि याच जोरावर भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला असल्याचं बोललं जात आहे.

भाजपने काय घेतला होता आक्षेप?

'भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या निवडणुकीचे एजंट हे पराग अळवणी यांनी यशोमती ठाकूर यांनी मत टाकताना मतपत्रिका जी त्यांच्या इलेक्शन एजंटला दाखवायची असते ती मतपत्रिका त्यांनी इलेक्शन एजंटच्या हातात दिलं.'

'त्याचप्रमाणे सुहास कांदे यांनी अशा अंतरावरुन मत दाखवलं की, जेणेकरुन दोन ठिकाणच्या म्हणजेच दोन पक्षाच्या एजंटला ते मत दिसेल. त्याच प्रमाणे अतुल सावे हे आमच्या अनिल बोंडेंचे इलेक्शन एजंट होते. त्यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने मत टाकताना प्रतोदाच्या हातात मतपत्रिका दिली ते सुद्धा आक्षेपार्ह होतं.' असा दावा प्रसाद लाड यांनी केला होता.

'याबाबत लेखी तक्रार करुन ही तीन मतं बाद करावी अशी मागणी आमच्या दोन्ही पोलिंग एजंटने केली आहे. मला वाटतं की, 100 टक्के असा प्रकार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ही मतं बाद करावीत ही विनंती पराग अळवणी यांनी केली आहे. मला खात्री आहे की, हे मत बाद होईल.' अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली होती.

biggest news of rajya sabha election results announced see who has won
राज्यसभा निवडणुकीत नेमकी कोणी मारली बाजी?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in