उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर : पक्ष वाचविण्याची धडपड म्हणतं भाजपची टीका

मुंबई तक

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काल (रविवारी) एकाच व्यासपीठावर आले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र दिसून आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवर पक्ष वाचविण्याची धडपड म्हणतं भाजपने टीका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काल (रविवारी) एकाच व्यासपीठावर आले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र दिसून आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीचे संकेत दिले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवर पक्ष वाचविण्याची धडपड म्हणतं भाजपने टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका मांडली.

प्रकाश आंबेडकरांचं कौतुक, भाजपवर टीका : उद्धव ठाकरेंकडून शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे संकेत

केशव उपाध्ये काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचा कार्यक्रमात लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र यायला हवं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.पण त्यांनी केलेला हा सर्वात मोठा विनोद आहे. कारण त्यांना लोकशाहीची चिंता नसून उरला-सुरला पक्ष वाचविण्यासाठीची त्यांची धडपड आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या कर्तृत्वावर ज्यांना काहीच करता येत नाही, त्यांनी लोकशाही वाचविण्याच्या गप्पा मारणं हा एक मोठा विनोद आहे.

वैचारिक विरोधावर ज्यांचा विश्वास नाही, एक प्रकारे दहशत माजवण्याची ज्यांनी प्रयत्न केला, त्या संभाजी ब्रिगेडसोबतही त्यांनी युती केली. नक्षलवाद्यांचं जे समर्थन करतात, त्याच्या सोबत आता ते जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर त्यांनी गुडघे टेकले आहेत. सत्तेसाठी राष्ट्रवादी-काँग्रेससमोर स्वाभिमान सोडून देऊन ते आता लोकशाही वाचविण्याच्या गप्पा मारत आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षात तरी लोकशाही आहे का हे आधी त्यांनी पहायला हव होतं. लोकशाहीनेच मिळालेल्या जनादेशाचा अपमान केल्याने त्यांच्या पक्षातील आमदार त्यांना सोडून गेले.

उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांचे कौतुक :

काही वर्षांपूर्वी कलिना इथे एक कार्यक्रम झाला होता. त्यात रामदास आठवले माझ्यासोबत होते. ते मला म्हणाले होते, उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. म्हटलं असं असेल तर नातू-ना मी असं कशाला. चला एकत्र येऊ. आज मला आनंद आहे, अभिमान आहे. असं काही नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. बोलतो. मध्ये-मध्ये भेटलेलोही आहे. पण त्यांच्यासोबत भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा याला मिनिटांचं गणित नाही.

आमच्या दोघांचं वैचारिक व्यासपीठ एकच :

आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमच्या दोघांचही एकचं आहे. ते एक असल्यामुळे आम्हाला दोघांनाही एकत्र येण्यात अडचण आली नाही, आणि ज्याची अपेक्षा लोकांना आहे, तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे एकत्र घेऊन चाललो आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp