Maharashtra Kesari 2023 : ब्रिजभूषण सिंह यांची विनंती अन् फडणवीसांचा क्षणांत घोषणांचा पाऊस
पुणे : देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल महाराष्ट्राने जिंकून दिलं होतं, पण त्या खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल जिंकणारा खेळाडू तयार झालेला नाही, अशी खंत अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केली. ते पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, खाशाबा जाधव यांच्यानंतर […]
ADVERTISEMENT

पुणे : देशाला पहिलं ऑलिम्पिक मेडल महाराष्ट्राने जिंकून दिलं होतं, पण त्या खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल जिंकणारा खेळाडू तयार झालेला नाही, अशी खंत अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केली. ते पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीत ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ पडला होता. २००८ साली तो दुष्काळ सुशिल कुमारने संपवला. त्यानंतर आजपर्यंत आपण ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सलग मेडल्स जिंकत आहोत. पण गेल्या ६१ वर्षांपासून यात महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक मेडल घेऊन आला नाही हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, महाराष्ट्राचं सरकारने मिशन ऑलिम्पिकची सुरुवात करावी. राज्यातील खेळाडूंना मदत करावी. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपावा.
ब्रिजभूषण सिंह यांच्या या विनंतीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
-
राज्यात मिशन ऑलिम्पिकची सुरुवात करणार. खेळाडूंना मदत करणार.