Chandrashekhar Bawankule: “संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसका बार सोडला”

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. आगामी सर्वच निवडणुका ते सोबत लढणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती का केली याची कारणं दिली आहेत. मात्र आता या युतीवरती टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फुसका बार म्हणत टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“2019 मध्ये संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती होती. त्यावेळी 40 जागांवर निवडणुका लढले त्यावेळी 36 हजाराच्या वर त्यांनी मतं घेतली नाही त्यांच्या मतांची टक्केवारी 0.06 टक्के होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसकाबार सोडला आहे. ज्याप्रमाणे राज्यात गेल्या अडीच वर्षात सरकार चालवलं त्यावरून त्यांच्यासोबत असेच सहकारी येतील” असंचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत काय म्हणाले?

तान्हा पोळा निमित्य उद्या आदित्य ठाकरे नागपुरात येत आहेत. त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ते इव्हेंट मॅनेजमेंट पण बंद होईल. जेव्हा जनतेची सेवा करण्याची संधी होती तेव्हा काही केलंनाही, त्यामुळे आता किती आव आणला तर जनता दाद देणार नाही.” असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोन्ही लढवय्या संघटना आहेत. आज महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडवून टाकणं, प्रादेशिक पक्ष संपवणं यालाच लोकशाही मानणारे काही लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत’, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. आमचा न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, पण हा जो निकाल लागणार आहे तोकेवळ शिवसेनेच्या भविष्याचाच असेल असं नाही, तर देशात लोकशाही राहिल की, बेबंदशाही राहिल हे ठरवणारा तो निकाल असेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT