Iqbal Chahal यांची चार तास चौकशी; काय सांगितलं, समोर आली मोठी गोष्ट
Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case: मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची ईडीने जवळपास चार तास चौकशी केली. कोरोना महामारी काळात मुंबईत जे जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आले होते, त्याची कंत्राटं शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या कंपनीला दिला […]
ADVERTISEMENT

Commissioner Iqbal Singh Chahal and ED Case:
मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची ईडीने जवळपास चार तास चौकशी केली. कोरोना महामारी काळात मुंबईत जे जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आले होते, त्याची कंत्राटं शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या कंपनीला दिला असल्याचा आरोप करण्यात आलं आहे. पुण्यातील एक जम्बो कोव्हिड सेंटर आणि मुंबईतील दोन सेंटरसाठी सुजित पाटकरांच्या कंपनीला कंत्राट दिली ज्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच प्रकरणी आता आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इक्बाल सिंह चहल यांनी ईडीला चार तासांच्या काळात अनेक गोष्टींबाबत मोठे खुलासे केले. चहल यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं की, महामारी काळात महापालिकेने आदेश जारी केले होते की, कोव्हिड सेंटर्ससाठी महापालिका एक ते दोन दिवसात निविदा जारी करेल आणि कोणालाही expression of interest साठी बोलवणार नाही.
सुजित पाटकरांनी कोव्हिड सेंटरसाठी बोली लावल्याबद्दल चहल यांनी सांगितलं की, ही संयुक्त बोली होती. परंतु उर्वरित दोन वैयक्तिक बोली होत्या. जेजे रुग्णालयाचे माजी डीन असलेले हेमंत गुप्ता हे सुजित पाटकर यांचे भागीदार होते. सुजित पाटकर यांनी बीकेसी आणि नेस्कोसाठी निविदा भरली होती, परंतु त्यांना त्या मिळाल्या नाहीत. दहिसरसाठी निविदा काढल्या, पण त्यासाठी कोणीही बोली न लावल्याने त्यांना ती मिळाली.