...तर उद्धव ठाकरेचं तोंड बंद करू, डोळे जागेवर ठेवणार नाही; राणेंचा ठाकरेंना गर्भित इशारा

Narayan Rane press conference : 'शिंदे गटातल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्रात फिरुनच दाखव'; राणे नक्की काय म्हणाले?
Union minister Narayan Rane and Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray
Union minister Narayan Rane and Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांसमोर केलेल्या भाषणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्ला केला. नरेंद्र मोदींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. भाजप नेते, शिंदे गटातील सहकाऱ्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं, तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे म्हणतात, मुंबा आईवर वार करायला येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कोण काढणार कोथळा? तू काढणार का? चाकू, सुरी हातात घेणार की आणखी काय घेणार? कुणाचा काढणारेस कोथळा?", असा टोला नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून लगावला.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरुनच दाखवावं; राणे काय म्हणाले?

"भारतीय जनता पक्षात अजून आमच्यासारखे लोक जिवंत आहेत. वाकड्या नजरेनं जरी पाहिलं ना, तर जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही. हे माझं त्याला (उद्धव ठाकरे) सांगणं आहे. यापुढे वाकड्या नजरेनं पाहिलं आणि भारतीय जनता पक्षातील तसेच आमचे मित्र एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांच्या केसाला धक्का लागला ना, तर महाराष्ट्रात फिरूनच दाखव. बघू आपण काय ते", असा धमकीवजा इशारा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

Union minister Narayan Rane and Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray
'अरे तुझी औकात आहे का?'; शिंदे, जाधवांचा उल्लेख, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर चढवला हल्ला
"धमक्या देऊ नको रे. कोथळा बिथळा काय तुझं काम नाहीये. तू कोंबड्या आणि बकऱ्याचं काळीज खाणारा तू. तुझं हे काम नाहीये. तुझ्या कोथळ्यात काही राहिलंच नाहीये, सगळ्या स्टेन्थचं आहेत. नऊ स्टेन्थचं आहे. उगाच बोलू नको", असंही राणे म्हणाले.

नारायण राणे : "ठाकरे कुटुंब आणि उद्धव ठाकरे आपोआपच संपणार, गिधाडांच्या स्वाधीन जाणार"

"उद्धव ठाकरे म्हणतात, 'त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन ठाकरे कुटुंबियांना संपवायचं.' संपलेल्यांना काय संपवायचं? आता तुरुंगात कधी जातात ते पाहायचं. कुणाला संपवायची गरज नाही. ठाकरे कुटुंब आणि उद्धव ठाकरे आपोआपच संपणार. असं बोलत बोलत संपणार. शेवटी गिधाडांच्या स्वाधीन होणार", असं भाष्य राणेंनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बोलताना केलं.

Union minister Narayan Rane and Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray
Narayan Rane : "...तर उद्या उद्धव ठाकरे संजय राऊतांचे सोबती म्हणून आत जातील"

"आता जशास तसं उत्तर नाही, तर उद्धव ठाकरेचं तोंड बंद करू"

"आता गटनेत्यांपर्यंत आलात. आता याच्याखाली शिवसैनिकच आहेत. आज एव्हढे येताहेत. पुढच्या वर्षी किती येताहेत ते बघा आणि महापालिकेत ते कुठे असतील ते पहा. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही नेत्याला, कोणत्याही लोकप्रतिनिधीला काही बोलले, तर जशास तसं उत्तर नाही, तर त्याचं (उद्धव ठाकरे) तोंड आम्ही बंद करू एव्हढंच आज सांगतो", असा गर्भित इशारा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in