हिटलरगिरी करुन वेगळं राज्य निर्माण करण्याचा केंद्राचा डाव, मंत्री यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप
स्मिता शिंदे ,चाकण(पुणे): लोकशाहीला विरोध करुन हिटलरगिरी निर्माण करुन वेगळं राज्य निर्माण करण्याचा डाव केंद्र सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. एवढंच नाही तर देशाचं संविधानाला तोडण्यासह देशाचा झेंडा बदलण्याचा डाव सुरु असल्याचाही गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर या चाकण येथील महिला […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे ,चाकण(पुणे): लोकशाहीला विरोध करुन हिटलरगिरी निर्माण करुन वेगळं राज्य निर्माण करण्याचा डाव केंद्र सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. एवढंच नाही तर देशाचं संविधानाला तोडण्यासह देशाचा झेंडा बदलण्याचा डाव सुरु असल्याचाही गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर या चाकण येथील महिला मेळाव्यात बोलत होत्या.
झेंडा आणि संविधान बदलण्याचा डाव आखला जात असताना देशातील महिलांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या चाकण येथे काँग्रेस महिला मेळाव्यात बोलत होत्या.
राज्यात महाविकास आघाडी झाली मात्र, पुणे जिल्ह्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या तोंडावर तीनही पक्ष एकत्र येऊन आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करत असताना काँग्रेसकडून मात्र महाविकास आघाडीतून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप यशोमती ठाकूरांकडून केला जात आहे.