PM Modi: ‘पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी कराच’, PM मोदींनी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुनावलं!
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज्य सरकारांना व्हॅट (VAT) कमी करण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने उशीर झाला असला तरीही आता राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत पंतप्रधान […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज्य सरकारांना व्हॅट (VAT) कमी करण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने उशीर झाला असला तरीही आता राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींची ही बैठक खरं तर कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती याबाबत होती. पण याचवेळी पंतप्रधान मोदींनी तेलाच्या वाढत्या किमतींचा उल्लेख देखील केला.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादात मोदी म्हणाले की, ‘युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम पुरवठा साखळीवर (Supply Chain) झाला आहे. अशा वातावरणात आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. हे जागतिक संकट अनेक आव्हाने घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक वाढवणे अत्यावश्यक झाले आहे.
मोदींनी पुढे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, ‘लोकांवरचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर राज्य सरकारांनाही व्हॅट कमी करण्यास सांगण्यात आले. काही राज्यांनी केंद्राचं म्हणणं ऐकून जनतेला दिलासा दिला, मात्र काही राज्यांनी तसे केले नाही.’