Deepak Kesarkar: "अनिल परब यांचा फोन तपासा म्हणजे कळेल ठाकरे-फडणवीस यांचं..."

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोनबाबत काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी
Check Anil Parab's phone to know whether Thackeray-Fadnavis has spoken or not Says Deepak Kesarkar
Check Anil Parab's phone to know whether Thackeray-Fadnavis has spoken or not Says Deepak Kesarkar

एकदा अनिल परब यांचा फोन तपासा म्हणजे कळेल की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे की नाही? आम्हाला माहित आहे उद्धव ठाकरे कोणाच्या फोनवरून फोन करतात असंही वक्तव्य दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. तसंच शिवसेना आमच्या रक्तात बाळासाहेब ठाकरेंनी भिनवली आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर उद्धव ठाकरे यांच्याबाबत नेमकं काय म्हटले ?

तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेनाच खरी आहे. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांची अकारण बदनामी केली जाते आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली. त्यांच्या मदतीला धावून आले त्यांना बदनाम केलं जातं आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून शिवसेना पाच वर्षे सत्तेत

एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून शिवसेना पाच वर्षे सत्तेत राहिली आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अनिल परब यांचा फोन तपासा म्हणजे तुम्हाला समजेल की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं की नाही? आम्हाला माहित आहे उद्धव ठाकरे कुणाच्या फोनवरून फोन करतात. एकनाथ शिंदे यांनी लढा दिला तो योग्यच आहे. लोकांमध्ये आत्ता सध्या काही लोक दिशाभूल करत आहेत. यात्रा काढत आहेत. तुम्ही यात्रा काढत आहात कारण कार्यकर्ते निघून जातील ही भीती तुम्हाला वाटते आहे. तुम्ही याआधी त्यांना कधी भेटला आहात का असा प्रश्न उपस्थित करत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेवरही निशाणा साधला आहे.

२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर राजकीय भूकंप आला. महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आता एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. असं घडू नये, पक्ष आणखी फुटू नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेत ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जात आहेत. मात्र रोज एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. शिवसेनेची प्रतिनिधी सभाही आता एकनाथ शिंदे ताब्यात घेऊन शिवसेनेला पडलेलं खिंडार आणखी वाढवायच्या तयारीत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in