CM एकनाथ शिंदेंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

नक्षलवाद्यांचे महाराष्ट्र सरकारलाही आव्हान
The Naxalists threatened to kill Dr Rahul Gethe in the written letter sent to his home.
The Naxalists threatened to kill Dr Rahul Gethe in the written letter sent to his home.Mumbai tak

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गेठे यांना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचे पत्र प्राप्त झाले. या पत्रात गडचिरोलीमधील विकासकामांमध्ये लक्ष न देण्याचे सांगत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

डॉ. राहुल गेठे हे एकनाथ शिंद यांच्याकडे पाच वर्षांपासून विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना शिंदेंनी नक्षलग्रस्त भागात विकास कामांची सुरू केली होती. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून राहुल गेठे यांच्यावर होती.

त्यावेळी नक्षलवाद्यांनी राहुल गेठे यांना आपल्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामे सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राहुल गेठे यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डॅाक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचं पत्र त्यांच्या घरी पाठवण्यातं आलं आहे.

राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या धमकी पत्रात काय लिहिल?

जय लाल सलाम

जय किसान

डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयोंका बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

भामरागड / एटापल्ली

CPI - कमिटी

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in