“अरे भास्कर… आता बस कर…”, चित्रा वाघ भास्कर जाधवांवर का संतापल्या?
भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल एक विधान केलं. या विधानावरून चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांच्यावर भडकल्या. भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल एक विधान केलं. या विधानावरून संताप व्यक्त करत चित्रा वाघ यांनी “अरे भास्कर… आता बस कर…”, म्हणत खडेबोल सुनावले आहेत.
ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचं अनावर करण्यात आलं. यावेळी भास्कर जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसारखे; भास्कर जाधव काय बोलले?
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव म्हणाले, “काय म्हणाले बावनखुळे. अध्यक्ष झाल्यानंतर भारीच बोलायला लागला. हे सारखं असं का वागतात म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं. म्हटलं बावनकुळे तर महाराष्ट्रातील आहेत पण, वाटताहेत वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे. बावनकुळे सारखे उद्धव ठाकरेंवर बोलतात.”
“परवा तर गडी भारीच फोफावला. कुणी तरी म्हटलं व्हिवियन रिचर्डसारखे. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग माझ्या लक्षात आलं की हा कर्टली एब्रोस यांच्यासारखा दिसतो. जुन्या लोकांना माहिती असेल, ते कसे होते. कदाचित बावनकुळे त्यांना लाजवतील. हा वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे दिसतात पण, ते खेळणारे होते. तुम्ही कुणाबरोबर खेळता आहात, उद्धव ठाकरेंबरोबर? एका बॉलमध्ये विकेट कधी काढतील, पत्ता लागणार नाही”, असं विधान भास्कर जाधव यांनी बावनकुळेंबद्दल केलं होतं.










