तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्यात कलह; दिवेगावकर यांनी दमदाटी केल्याचा आरोप
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यातील कलह समोर आला आहे. तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेड्डी यांनी तसं लेखी सावंत यांना कळवलं आहे. यावरून तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दिवेगावकर यांची […]
ADVERTISEMENT

गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद
आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यातील कलह समोर आला आहे. तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेड्डी यांनी तसं लेखी सावंत यांना कळवलं आहे. यावरून तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दिवेगावकर यांची तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आपल्या बाजूने काय मांडतात याकडे लक्ष राहणार आहे.
काय आहे प्रकरण?
18 ऑगस्टपासून मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार रेड्डी हे काम पाहत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावंत यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सद्यस्थितीमध्ये असलेल्या कामांची व प्रगती अहवाल माहिती मी अधिकारी यांच्याकडून गोळा करीत आहे. हे काम करीत असताना जिल्हाधिकारी यांनी त्यांचे लघुलेखक व स्वीय सहायक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोबाईल फोनवरून 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता फोन केला. व घेत असलेली माहिती कोणत्या अधिकारात संकलित करीत आहात? याबाबत विचारणा केली.