अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार, माफीनामा; सोनिया गांधींच्या भेटीनंतर काय म्हणाले अशोक गहलोत?
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 1.30 तास चालली. बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. इतकंच नाही तर राजस्थानमध्ये जे घडलं त्यामुळे मी खूप दुखावलो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची माफीही मागितली […]
ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 1.30 तास चालली. बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. इतकंच नाही तर राजस्थानमध्ये जे घडलं त्यामुळे मी खूप दुखावलो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची माफीही मागितली आहे.
मी काँग्रेसचा निष्ठावंत
सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर अशोक गहलोत म्हणाले की, इंदिरा गांधींच्या काळापासून गेली 50 वर्षे मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक म्हणून काम केले. माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यावर जी काही जबाबदारी आली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. अशोक गेहलोत म्हणाले की, जेव्हा राहुल गांधींनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता, तेव्हा मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेने हादरलो आहे. यासाठी मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. यामुळे मी खूप दुखावलो आहे, असं ते म्हणाले.
माफी मागून सोनियांना भेटायला गेले