Rahul Gandhi : नोटीस आली, खासदारकीवर टांगती तलवार; राहुल गांधी म्हणाले…

मुंबई तक

Congress leader Rahul Gandhi’s speech : नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्यातील संबंधांवर लोकसभेत (Loksabha) केलेल्या भाषणाबाबत देशभर चर्चा झाली. याच भाषणानंतर राहुल गांधी (Rahul gandhi) यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्यात आली आहे. “पण मी संसदेत काहीही चुकीचे बोललेले नाही, लोकं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Congress leader Rahul Gandhi’s speech :

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्यातील संबंधांवर लोकसभेत (Loksabha) केलेल्या भाषणाबाबत देशभर चर्चा झाली. याच भाषणानंतर राहुल गांधी (Rahul gandhi) यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्यात आली आहे. “पण मी संसदेत काहीही चुकीचे बोललेले नाही, लोकं हवे असल्यास गुगलही करू शकतात”, असं म्हणतं त्यांनी या नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे. (Congress leader Rahul Gandhi’s speech in the Lok Sabha on the relationship between Prime Minister Narendra Modi and businessman Gautam Adani)

राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदाणी यांच्यातील संबंधांवर मी सभागृहात भाषण केलं होतं. मी माझा मुद्दा अतिशय शांत आणि नम्रपणे मांडला, कोणतीही वाईट भाषा वापरली नाही. माझ्या बाजूनं काही तथ्य मांडली. अदाणी पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर कसे जायचे आणि नंतर त्यांना मोठे कंत्राट मिळत असे, विमानतळावरील ३० टक्के वाहतूक अदाणीद्वारे कशी नियंत्रित केली जाते, हे मी म्हटलं होतं. पण अदाणी आणि अंबानी यांच्याबद्दल बोलणे हा पंतप्रधानांचा अपमान आहे असं सध्या दिसतं.

Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!

हे वाचलं का?

    follow whatsapp