सुनिल केदार यांचा बावनकुळेंना धोबीपछाड; नागपूरमध्येच दिला मोठा धक्का
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिला आहे.
ADVERTISEMENT

नागपूर : जिल्ह्यातील 7 तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेस (Congress) नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला (BJP) धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, रामटेक, कुही- मांढळ, उमरेड, भिवापूर, मौदा आणि पारशिवनी या 7 ठिकाणी बाजार समित्यांच्या निवडणूक होणार आहेत. त्यापैकी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळी सुद्धा यश आले आहे. (Congress leader Sunil Kedar has unopposing the election of Agricultural Produce Market Committee in Savner taluka.)
नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणूक :
1) सावनेर-बिनविरोध – केदार गट
2) रामटेक- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
3) कुही- मांढळ- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी










