Nawab Malik यांना ईडीचा दणका, संपत्ती जप्त करण्यास परवानगी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आणखी एक दणका दिला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची संमती ईडीला मिळाली आहे. त्यामुळे हा नवाब मलिक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा भाग, कुर्ला पश्चिम या ठिकाणी असलेल्या तीन फ्लॅट, वांद्रे […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आणखी एक दणका दिला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची संमती ईडीला मिळाली आहे. त्यामुळे हा नवाब मलिक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा भाग, कुर्ला पश्चिम या ठिकाणी असलेल्या तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम या ठिकाणी दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेत जमिनीचा समावेश आहे. या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसीना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यात नवाब मिलक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने या जप्तीला मंजुरी दिली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत.
नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्यावर काय आहेत आरोप?
कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. ही जागा मुनिरा प्लंबर यांची होती. मुनिरा यांनी आपली जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे.