ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदे गटाची सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सत्तानाट्याचा संघर्ष तीव्र होताना दिसतो आहे. ही लढाई आता सुप्रीम कोर्टात गेली आहे. सुप्रीम कोर्टाने या सगळ्या आमदारांचं निलंबन ११ जुलैपर्यंत करू नका असं म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातला ठाकरे विरूद्ध शिंदे सामना लांबला आहे. अशात आता एकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ते राज्यपालांची भेटही घेऊ शकतात.

एकनाथ शिंदेंसह बंडखोर मंत्र्यांना ठाकरेंचा झटका; कोणत्या मंत्र्यांचं खातं कुणाकडे?

२१ जूनला महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं बंड समोर आलं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ३५ पेक्षा जास्त आमदारांचा गट घेऊन सुरतला गेले. ही बंडखोरी ही शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आहे. शिंदे गटात आता ३९ शिवसेना आमदार आहेत तर १२ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांची संख्या ५१ झाली आहे. आता बंडखोर आमदारांचा हा गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी करतो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुण्यात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारत आंदोलन

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सुरूवातीला काहीसे भावनिक झालेले उद्धव ठाकरे हे नंतर आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. आपल्या दोन भाषणांमधून त्यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात दाखल

ADVERTISEMENT

मागच्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून सेना पदाधिकारी तसंच कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यात आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांवर तुटून पडल्याचं पाहण्यास मिळतं आहे. तर संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. त्यांनी या बंडखोर आमदारांची तुलना रेड्यांशी केली आहे. तसंच या शिवसैनिक आमदारांचा आत्मा मेला आहे ते येतील तेव्हा त्यांची जिवंत प्रेतंच येतील आत्मा गेलेला असेल. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टातली लढाई ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. तर तिकडे दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने आता आणखी वेळ आपल्याला मिळाल्याने सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी राज्यपालांची भेट घ्यायचं ठरवलं असून लवकरच ते पाठिंबाही काढू शकतात. तसं झालं तर ठाकरेंचं टेन्शन अजून वाढणार यात काहीही शंका नाही. तसंच महाराष्ट्रात नेमकं काय होणार याचा अंदाज आत्ता पूर्णपणे बांधता येत नसला तरीही शिवसेनेच्या गोटात खळबळ झाली आहे हे नक्की. तसंच सरकार अल्पमतात आलं तर भाजप काय करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT