महाराष्ट्र सदनातून एकनाथ शिंदे 20 मिनिटासाठी अचानक झाले गायब, चर्चांना उधाण
नवी दिल्ली: शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा काल गोरेगाव येथे पार पडला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गट, भाजप, अमित शाह, राज ठाकरेंवरती टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील भाषण संपताच दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते, २१ राज्यातील अध्यक्षांचा छोटेखानी मेळावा काल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पार पडला. हा मेळावा सुरु असतानाच एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा काल गोरेगाव येथे पार पडला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गट, भाजप, अमित शाह, राज ठाकरेंवरती टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील भाषण संपताच दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होते, २१ राज्यातील अध्यक्षांचा छोटेखानी मेळावा काल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात पार पडला.
हा मेळावा सुरु असतानाच एकनाथ शिंदे अचानक महाराष्ट्र सदन बाहेर पडले, त्यानंतर ते तब्बल २० मिनीटं महाराष्ट्र सदनात नव्हते. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधान आले. एकनाथ शिंदेंनी या २० मिनीटामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीबाबत एकनाथ शिंदे किंवा भाजपने कोणतीच अधिकृत वाच्यता केलेली नाहीये. परंतु राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये नक्की काय झालं?
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा याची माहिती अजून समोर आलेली नाही. येत्या २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे, यावेळेस महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात झालेला सत्तापालट, शिवसेनेचं चिन्ह तसंच अनेक याचिकांवरती न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या या भेटीला महत्त्व प्रात्प झालं आहे. खरं तर एकनाथ शिंदे काल रात्री उशीरा मुंबईमध्ये येणार होते मात्र त्यांनी आपला मुक्काम दिल्लीतच करायचं ठरवलं.
उद्धव ठाकरेंच्या खासदाराकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; ‘राष्ट्रवादी’सोबत युती न करण्याची मागणी