आदित्य ठाकरेंच्या ‘शिव संवाद यात्रे’ला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर; आज मालेगावात जाहीर सभा
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा ज्या जिल्ह्यांतून गेली, त्याच जिल्ह्यांचा आता एकनाथ शिंदे दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आजपासून (२९ जुलै) तीन दिवसांच्या दौऱ्यांसाठी रवाना होणार आहेत. शिंदे यांचा हा शासकीय दौरा असला, तरी या दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रेदरम्यान ज्या आमदारांवर टीका केली, त्यांच्या भेटी घेणार आहेत. शिवसेनेतील […]
ADVERTISEMENT

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा ज्या जिल्ह्यांतून गेली, त्याच जिल्ह्यांचा आता एकनाथ शिंदे दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आजपासून (२९ जुलै) तीन दिवसांच्या दौऱ्यांसाठी रवाना होणार आहेत. शिंदे यांचा हा शासकीय दौरा असला, तरी या दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रेदरम्यान ज्या आमदारांवर टीका केली, त्यांच्या भेटी घेणार आहेत.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील शिव संवाद यात्रा भिंवडीतून सुरू होऊन शिर्डी येथे संपली होती. ही यात्रा नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातून गेली.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासकीय दौरा जाहीर झाला असून, शिंदे हे सुद्धा याच जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रेदरम्यान केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देऊ शकतात.
एकनाथ शिंदे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जाणार?
एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवसीय दौऱ्याला शुक्रवारपासून (२९ जुलै) सुरूवात होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे विविध कामांचा आढावा आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदही होणार आहे. मालेगाव हा दादाजी भुसे यांचा मतदार संघ असून, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी सभा होणार आहे. औरंगाबादकडे रवाना होणार आहे. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत.