Shiv Sena split : निकाल लांबणार? शिंदे-ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?
शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणात आथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी लिखित सुनावणीबद्दल महत्त्वाचे निर्देश दिलेत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे शिवसेनेतल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणात आथा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी लिखित सुनावणीबद्दल महत्त्वाचे निर्देश दिलेत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे
शिवसेनेतल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून दाखल करण्यात आलेली याचिका, राज्यपालांनी सरकार स्थापनेचं दिलेलं निमंत्रण या आणि इतर मुद्द्यांसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एम.आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर पाच सदस्यीय घटनापीठाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना सांगितलं की, त्यांचे मुद्दे संक्षिप्त स्वरुपात मांडावेत.