एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय बालाजी किणीकर यांच्या घराबाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र सरकारमधले महत्त्वाचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवलं. विधान परिषद निवडणूक निकालात भाजपची सरशी झाली. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीला सुरुंग लागला तो दुसऱ्या दिवशी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे.

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्याची सुरूवात खूप आधीच झाली होती. भाजपसोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणं हे एकनाथ शिंदे यांना मुळीच पसंत नव्हतं. एकनाथ शिंदे भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. मात्र ते काही घडलं नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचे खंदे समर्थक आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही सोमवारी रात्रीपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खबरदारी म्हणून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. सोमवारी रात्रीपासून त्यांच्यासी संपर्क होऊ शकलेला नाही, असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असल्याची शक्यता अधिक आहे. डॉ. किणीकर अंबरनाथ पूर्वेतील बी केबीन रस्त्यावरील निसर्ग ग्रीन या सोसायटीमध्ये राहतात. खबरदारी म्हणून डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर शिवाजीनगर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

राजकारणापासून दूर असलेले आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉ. बालाजी किणीकर 2009 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून विधासभेत गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा होता. मात्र त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत डॉ. किणीकर यांना पक्षातील एका गटाने अप्रत्यक्ष विरोध केला होता. त्यानंतरही डॉ. किणीकर मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांच्या विजयामागे एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली डॉ. किणीकर काम करत आहेत. अगदी साधी राहणी असलेले डॉ. किणीकर त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारख्या वागण्यामुळे मतदारसंघात परिचीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT