EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NCP: नवी दिल्ली: एकीकडे संपूर्ण देशाला दिवाळीचे वेध लागलेले असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर मात्र बऱ्याच उलथापालथी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. काही महिन्यांपूर्वीच शिवसेना पक्ष हा शिंदेंकडे सोपविल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. आता पुन्हा एकदा असंच प्रकरण निवडणूक आयोगासमोर आलं असून त्याची आज (9 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यासाठी आमनेसामने आले आहेत. याचबाबतच्या सुनावणीत अजित पवार गटाने 20 हजार शपथपत्रांमध्ये खोटेपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (election commission hearing ajit pawar faction lies 20 thousand affidavits have errors sharad pawar faction lawyer abhishek manu singhvi major allegation)

शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी त्यांनी थेट असं म्हटलं की, अजित पवार गटाने विकृत पद्धतीने खोटेपणा केला असून त्यांचावर कारवाई झाली पाहिजे तसंच त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले पाहिजे.

अजित पवार गटावर अभिषेक मनु सिंघवींचे गंभीर आरोप..

‘जवळजवळ दीड तास निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद झाल्यानंतर आजची सुनावणी संपली. आमच्याकडून जेव्हा युक्तिवाद सुरू झाला तेव्हा आम्ही अत्यंत धक्कादायक असे आणि विचित्र अशा गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘यामध्ये महत्त्वाची बाब ही होती की, जी कागदपत्रं याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाकडे दिली होती. आम्ही जवळजवळ 20 हजार असे शपथपत्र शोधले आहेत. त्यापैकी 8900 शपथपत्रांची यादी बनवून दिली आहे निवडणूक आयोगाला. ज्यामध्ये भ्रष्ट पद्धतीने विकृत पद्धतीने शपथपत्र आणि कागदपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत.’

हे ही वाचा>> Lok Sahba 2024: “मविआला 31 ते 33, तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार”

‘जे आजही दाखवून देतं की, हा घोटाळा आहे, खोटेपणा आहे. उदाहरणार्थ.. एक व्यक्ती हा मृत आहे. ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचं देखील शपथपत्र जोडलं गेलं आहे. दुसरं उदाहरण आहे की, एक अल्पवयीन आहे.. त्याचंही शपथपत्र जोडण्यात आलं आहे.’

ADVERTISEMENT

‘तिसरं उदाहरण.. असे अनेक शपथपत्रं आहेत की, जी पदं लिहली आहेत NCP ची.. ती पदं पक्षात अस्तित्वातच नाहीत.’

ADVERTISEMENT

‘अशाप्रकारे आम्ही 24 कॅटेगरी बनवल्या आहेत. त्यातून असं दिसतंय की, हा खोटा प्रचार आहे. फक्त एका खोट्या केसला समर्थन देण्यासाठी. याचा अर्थ हा झाला की, तुम्ही ज्याला अजित पवार गट म्हणतात त्यांच्याकडे कोणतंही समर्थन नाही.’

हे ही वाचा>> Manoj Jarange : “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

‘ही सुनावणी आता 20 नोव्हेंबरला होईल. यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली की, हे एवढं गंभीर आहे आणि एवढं व्यापक आहे की, आपण याविरोधात कायदेशीर कारवाई केली पाहिजे. खोटं जबाब, खोटे शपथपत्र दिले यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे.’ असं अभिषेक सिंघवी म्हणाले.

हा सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न- सुनील तटकरे

दरम्यान, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शपथपत्रांमधील त्रुटी या त्यांच्याकडून देखील आहेत. काही प्रमाणात किरकोळ त्रुटी आहेत. पण हा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT