Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषेदतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा…
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (4 मे) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. हा विषय काही एक दिवसाची नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा भोंग्यावरुन अजान होईल तेव्हा-तेव्हा हनुमान चालीसा लावणारच असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या प्रत्येक शब्द जसाच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (4 मे) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. हा विषय काही एक दिवसाची नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा भोंग्यावरुन अजान होईल तेव्हा-तेव्हा हनुमान चालीसा लावणारच असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या प्रत्येक शब्द जसाच्या तसा…
पाहा राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले:
‘सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलीस नोटीस पाठवत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होते एवढाच प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करतायेत त्यांना तुम्ही सजा देणार आणि जे कायद्याचं पालन करत नाहीएत त्यांना तुम्ही मोकळीक देणार. तरीही मी आज तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की, आज 90 ते 92 ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही.’
‘सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. पण मी खास करुन त्या मशिदींमध्ये जे काही मौलवी आहे त्यांचे आभार मानेन की, आमचा जो विषय आहे तो त्यांना नीट समजला. मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टप्रमाणे. मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिंदीवर सकाळची अजान 5 वाजेच्या आत लावली गेली.’