भारतातील ‘या’ चार उपराष्ट्रपतींची अशी झाली होती बिनविरोध निवड!

मुंबई तक

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार असल्याने, 16 व्या उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. 16 व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी, इलेक्टोरल कॉलेजमध्ये 233 निवडून आलेले सदस्य आणि राज्यसभेचे 12 नामनिर्देशित सदस्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार असल्याने, 16 व्या उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. 16 व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी, इलेक्टोरल कॉलेजमध्ये 233 निवडून आलेले सदस्य आणि राज्यसभेचे 12 नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे 543 निवडून आलेले सदस्य भाग घेत असतात. इलेक्टोरल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकूण 788 सदस्य असतात.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर यांनी 18 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मंगळवारी, 19 जुलै रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी इतिहासात डोकावले असता चार उपराष्ट्रपतींची निवड बिनविरोध झाली होती.

पहिली उपराष्ट्रपती निवडणूक – 1952

पहिल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शेख खादीर हुसेन या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर, रिटर्निंग ऑफिसरने शेख खादीर हुसेन यांचा अर्ज फेटाळला. एकमेव उमेदवार असल्याने, डॉ. राधाकृष्णन यांना 25 एप्रिल 1952 रोजी उपराष्ट्रपती पदावर बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp