फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्येच होणार, मोदींच्या फोननंतर उदय सामंतांची माहिती

मुंबई तक

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार घेतली. त्यात त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्येच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितले आहे. आगामी काळात महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार घेतली. त्यात त्यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्येच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितले आहे. आगामी काळात महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका. सगळं जे वाईट होतंय, ते आमच्यामुळे आणि चांगलं घडतंय, ते तुमच्यामुळे असं होत नसतं असं उदय सामंत म्हणाले आहेत. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात येत असल्याने शिंदे-भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे.

जे कालपर्यंत सांगितलं जातं की आम्ही पॅकेज दिलं होतं. तर मग हाय पॉवर कमिटीची मिटिंग त्या सरकारने का घेतली नाही? असाही प्रश्न उदय सामंत यांनी विचारला आहे. जी हाय पॉवर कमिटीची मिटिंग असते ती मिटिंग १५ जुलै २०२२ ला झाली त्यावेळी राज्यात सत्ताबदल झाला होता. ३८ हजार कोटींचं पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १५ जुलैला हा निर्णय झाला. त्याआधी झाला असता तर महाराष्ट्रात हा प्रकल्प झाला असता.

चांगलं झालं तर आमच्यामुळेच झालं आणि वाईट झालं तर शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं आहे ही विरोधकांची प्रवृत्ती चुकीची आहे. सात महिन्यांच्या कालावधीत जे पॅकेज देण्याचं आश्वासन दिलं असतं. मात्र आता स्वतःवर खापर फुटेल या भावनेतून आमच्यावर खापर फोडत आहेत असंही उदय सामंत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. आगामी काळात मोठ्यात मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात दिला जाईल. असं आश्वासन दिलं आहे. महाराष्ट्रातल्या बेरोजागारीचा प्रश्न सुटला पाहिजे हे केंद्र सरकारनेही म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp