सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; आमदार दीपक केसरकर यांची मागणी

मुंबई तक

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही. ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही.

ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदे गटाची
सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी

विधान परिषद निकालाच्या बरोबर एक दिवस नंतर म्हणजेच २१ जून ला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. या बंडामुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंसमोर सरकार वाचवण्यासोबतच शिवसेना हा पक्षही वाचवण्याचं आव्हान आहे कारण एकनाथ शिंदे गट हा आम्हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असं म्हणत बाहेर पडला आहे. तसंच हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना विरूद्ध शिवसेना असाच सामना पाहण्यास मिळतो आहे. अशात आता दीपक केसरकर यांनी आज तकसोबत चर्चा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp