सरपंचांच्या हाती उपसरपंचाच्या निवडीची चावी! दोन मत ठरणार निर्णायक
सातारा : राज्यात नुकत्याच ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २० डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमध्ये थेट लोकांमधून सरपंचांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा बसल्यानंतर या नव्या ग्रामपंचायतींमध्ये आता उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा निवड कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या निवड कार्यक्रमात उपसरपंच कोण होणार […]
ADVERTISEMENT

सातारा : राज्यात नुकत्याच ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २० डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमध्ये थेट लोकांमधून सरपंचांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा बसल्यानंतर या नव्या ग्रामपंचायतींमध्ये आता उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा निवड कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
या निवड कार्यक्रमात उपसरपंच कोण होणार हे ठरविण्यासाठी जेवढं निर्वाचित सदस्यांचं मत निर्णायक ठरणार आहे, त्याहून अधिक निर्णायक मत सरपंचांचं ठरणार आहे. कारण सरपंचांना या निवडीत दोन मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याच दोन निर्णयाक मतांमुळे या निवडीची सुत्र सरपंचांच्या हाती असल्याच चित्र आहे.
नेमकं काय आहे सूत्र?
उपसरपंच निवड कार्यक्रमात सरपंच हे ग्रामपंचायतीचे पदसिध्द सदस्य म्हणून त्यांचं पहिलं मत देणार आहेत. तर अधिनियमातील नव्या तरतुदींनुसार उपसरपंच निवडीवेळी समसमान मत पडल्यास आणखी एक निर्णायक मत म्हणजे कायदेशीर अधिकार सरपंचांना असणार आहे.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच वेगळ्या गटाचा तर सदस्य वेगळ्या गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सरपंचांचं मत अधिक महत्वाचं ठरणार आहे.