Gujarat Election : केवळ २ जागा जिंकल्या तरीही राष्ट्रीय राजकारणात ‘आप’ ठरु शकतो हिरो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं सर्व टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. त्यानंतर आता राजकीय पक्षांसह सर्वसामान्याचे डोळेही ८ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. मात्र त्याआधी निकालपूर्व एक्झिट पोल जाहीर झाले असून त्या आधारे विजय-पराजयाचा अंदाज वर्तविला जात आहे.

यातील इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपलाच सत्ता दिल्याचं पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मात्र पराभावाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत काँग्रेस अवघ्या १६ ते ३० जागा आणि आपला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आम आदमी पक्षाकडे मोठी संधी?

एक्झिट पोल खरे ठरले तर विजय-पराभवनंतरही आम आदमी पक्षाला राष्ट्रीय राजकारणात पाय रोवण्याची नामी संधी मिळू शकते. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला दर्जा मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. आम आदमी पक्षाला देशातील नववा राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी गुजरातमध्ये किमान दोन जागा किंवा ६ टक्के मतदान मिळण्याची आवश्यकता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहेत?

  • लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान २ टक्के जागा ३ राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत ३ राज्यांमधून किमान ११ खासदार.

  • लोकसभेत किमान ४ खासदार. सोबतच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ६ टक्के मत.

  • ADVERTISEMENT

  • किमान ४ राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा.

  • ADVERTISEMENT

    राज्य पक्षाचा दर्जा मिळवण्याचे निकष आहेत?

    • संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ८ टक्के मत

    • संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मत आणि २ विधानसभा सदस्य

    • संबंधित पक्षाचे त्या राज्यात किमान ३ विधानसभा सदस्य.

    आम आदमी पक्षाची सद्य स्थिती काय आहे?

    आम आदमी पक्षाची दिल्ली, पंजाबमध्ये संपूर्ण बहुमतासह सत्ता आहे. या दोन राज्यांसोबतच गोव्यातही आपला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. ‘आप’चे गोव्यात सध्या २ आमदार आणि ६ टक्के मत आहेत. तर आता चौथ्या राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये दोन आमदार किंवा ६ टक्के मत मिळविल्यास आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते.

    सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षांना आहे?

    देशात सध्या ८ राजकीय पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा आहे. यात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षांचा समावेश आहे.

    २०२४ नंतर होणार दर्जा निश्चित :

    २०१४ पूर्वी निवडणूक आयोगाकडून दर ५ वर्षांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा निश्चित केला जात होता. मात्र २०१६ मधील सुधारणेनंतर निवडणूक आयोग दर १० वर्षांनी राजकीय पक्षाचा दर्जा निश्चित करणार आहे. परिणामी, ५ वर्षे सर्व पक्षांना सद्य स्थितीतील दर्जानुसार मुदतवाढ मिळाली आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा निश्चित केला जाणार आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT