'त्यावेळी गणपतीच नाहीतर सर्व देव आठवत होते'; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

अखंड परंपरेने यंदाही मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी बाप्पांची भक्तीपूर्ण वातावरणात स्थापना...
'त्यावेळी गणपतीच नाहीतर सर्व देव आठवत होते'; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

जळगाव: शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात सहभागी होतानाचा जो निर्णय घेतला त्यावेळी गणपती बाप्पाचं नव्हे तर अक्षरशा सर्व देव आठवले होते, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

अखंड परंपरेनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गणेशोत्सव साजरा केला जातो. मोठ्या भक्ती भावाने मंत्री पाटील यांच्या घरी दहा दिवस बाप्पांची स्थापना केली जाते. आजही मंत्री पाटील त्यांच्या घरी भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाची स्थापना केल्याचं पाहायला मिळालं.

देवाच्या आर्शीवादाने आजपर्यंत यश दिलं- गुलाबराव पाटील

''राजकारण काय कुठलेही क्षेत्र असो संकट हे येत असतात त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो त्यावेळी सर्वच देव आठवले होते, देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळाला आहे यापुढेही देव नेहमी असेच पाठीशी उभे राहतील अशी प्रार्थना बापाकडे केली असल्याचं'' मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे, राहणार- गुलाबराव पाटील

सद्यस्थितीत राज्यात शिवसेनेमध्ये जे दोन गट पडले आहेत, त्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले ''आमची जी शिवसेना आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठीच हा उठाव केला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती व शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणार. बाळासाहेब ठाकरेंचे विचार तेवत राहावे, शिवसेनेच गत वैभव आहे. ते गत वैभव दुपटीने होवू दे... अस आज माझं बाप्पाला साकडं'' असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आमदार भास्कर जाधवांच्या शुभेच्छा चर्चेत

आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले यावेळी सर्वांना महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून सर्वच नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी भास्कर जाधव यांच्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहेत. महाविकास आघाडी सरकारनं चांगलं केलं होतं, तीच परिस्थिती, तेच वातावरण पुढच्या काळात महाराष्ट्रात राहावं, शेतकऱ्यांवरचं संकट कमी व्हावं असं भास्कर जाधव म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in