राज्य कसं चालवायचं, हे फडणवीसांकडून शिका; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यकारभार कसा करायचा हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं सल्ला राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे. माझे अजूनही प्रकृतीबद्दल समस्या आहेत. जे माझ्यासोबत […]
ADVERTISEMENT

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यकारभार कसा करायचा हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं सल्ला राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे. माझे अजूनही प्रकृतीबद्दल समस्या आहेत. जे माझ्यासोबत घडलं, त्यावर कुणी कारवाई केली नाही.”
नवनीत राणांनी तब्येत ठीक नसतानाही डिस्चार्ज का घेतला?
“कुणी दंगा केला, तर ठाकरेंच्या गुंडांनी केला. अमरावती आणि मुंबईत आमच्या घरांच्या बाहेर गुंड पाठवण्यात आले. शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला. त्याबाबत मी तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. संजय राऊत पोपट आहेत. रवी राणांच्या भाषेत चवन्नी छाप आहेत. त्यांनी २० फूट खड्ड्यात गाडू असं विधान केलं. त्यावरही कारवाई झाली नाही. त्यावर कारवाई व्हावी म्हणून मी दिल्लीत जात आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.