देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं. तेव्हा नेमकं काय झालं? दोन तासात सगळा निर्णय वेगळा कसा झाला? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘आज तक’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय?

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का? नाही मला असं वाटलं नव्हतं कारण त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मी सरकारच्या बाहेर राहिन. मात्र आमची सगळ्यांची इच्छा होती की ते मंत्रिमंडळात असावेत. देवेंद्र फडणवीस आमच्या मंत्रिमंडळात असतील तर विकास आणखी वेगाने होईल. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना म्हणजेच भाजपच्या वरिष्ठांचा आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांचा त्यांना मेसेज आला. त्यातच मी मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. मी जेव्हा सागर बंगल्यावर गेलो होतो तेव्हाच त्यांना मेसेज आला होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. ही माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तकशी बोलताना दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा तसंच आनंद दिघे यांच्या आदर्शांचा विजय झाला आहे त्यामुळेच मी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो आहे असं एकनाथ शिंदे यांनी आज तकशी बोलताना सांगितलं. माझ्यासोबत जे आमदार आले त्या सगळ्यांचा हा विजय आहे. अनेकदा लोक विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जातात. मात्र आम्ही सत्ता सोडली आणि विरोधकांकडे आलो. याचं कारण होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व होतं तसंच आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी वेगळं काहीच सांगत नव्हतो, अडीच वर्षापूर्वी वचन पाळलं असतं तरीही हेच घडलं असतं. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कुठे वेगळ्या वाटेवर आलो आहोत? शिवसेना भाजपची युती होती. आम्ही युती म्हणूनच लढलो होतो. आता आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचा गट आहे. आज तो शिवसेनेचा गट भाजपसोबत आहे. आम्ही चुकीचं पाऊल उचललं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही कारण शिवसेना आमचा पक्ष आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की योग्य वेळी मी याचं उत्तर देईन.

ADVERTISEMENT

आम्ही एक बळकट सरकार आहोत. हे पुढचं अडीच वर्षे चालणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातलं सरकार चालणार आहे. काँग्रेस तसंच राष्ट्रवादी म्हणत आहेत हे ईडीचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. जे काही बंड घडलं ते बंड का घडलं हे प्रत्येकाने विचार करून स्वतःला विचारलं पाहिजे. आम्ही सत्ता सोडून भाजपसोबत का आलो याचा विचार आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अंतर्मुख व्हावं.

आमच्या आमदारांवरही आरोप केले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही त्यांच्यासोबत राहिलो असतो तर आणखी अडीच वर्षांनी आमच्या लोकांना निवडणूक जिंकणं कठीण झालं असतं. लोकशाहीत एकजुटीला खूप महत्त्व आहे. हे सामान्य माणसाचं सरकार आहे. राज्याचा विकास करणं हाच आमचा अजेंडा आहे.

शेतकऱ्यांना त्याच्या पायावर उभं करणं, त्यांना स्वयंपूर्ण करणं हे आमचं लक्ष्य आहे. आमच्याकडे १७० आमदारांचं समर्थन आहे. शिवसेनेतले दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार आमच्या साथीला आहेत, आम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलेलं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT