‘खरी शिवसेना तुमचीच कशी? कागदपत्रं सादर करा’; निवडणूक आयोगाने ठाकरेंना दिला काही तासांचा वेळ
खरी शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानंतर आता पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण यावरही दावा सांगितला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना अवघ्या काही तासांची वेळ दिली आहे. खरी शिवसेना तुमचीच कशी याची कागदपत्रं शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर […]
ADVERTISEMENT

खरी शिवसेना कुणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानंतर आता पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण यावरही दावा सांगितला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना अवघ्या काही तासांची वेळ दिली आहे. खरी शिवसेना तुमचीच कशी याची कागदपत्रं शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करा असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आज काय केलं?
शिवसेनेत एकानाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन गट पडले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचा हा फैसला निवडणूक आयोग करणार असं म्हटलं आहे. त्यानंतर आता शिंदे विरूद्ध ठाकरे हा सामना निवडणूक आयोगाच्या दारात आला आहे. दोन्ही गटांनी आज नाव आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यासंदर्भातले दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सोपवले आहेत.
अनिल देसाई यांनी काय म्हटलं आहे?
आम्ही आमची कागदपत्रं सादर करण्यासाठी आणखी अवधी मागितला आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना कागदपत्रं सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.
निवडणूक आयोगात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कोणत्या तीन मुद्द्यांवर घेरणार?
१) शिवसेनेचा जो वाद आहे त्यात निवडणूक आयोगाला शिंदे गटाने कोणती कागदपत्रं सादर केली आहेत ? ती मागितली आहेत. अद्याप ही कागदपत्रं शिंदे गटाकडून देण्यात आलेली नाहीत. शिंदे गटाकडून पक्ष आमचाच आहे ही कागदपत्रं जी सादर केली गेली आहे त्याची आम्हाला माहिती नाही असंही ठाकरे गटाने सांगितलं आहे. त्यामुळे आम्हाला मुदत मिळावी असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.