Jalgaon: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा फोटो हातात घेऊन शिवसैनिकांची भावनिक यात्रा

मुंबई तक

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण ३५ पेक्षा जास्त आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात तसंच शिवसेनेत खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील घडत असलेली राजकीय परिस्तिथी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण ३५ पेक्षा जास्त आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात तसंच शिवसेनेत खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रातील घडत असलेली राजकीय परिस्तिथी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांची होत असलेली कुचंबणा काय होते याचा प्रत्यय जळगाव शहरात आला. जळगावातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो हातात घेऊन एक भावनिक यात्राच काढली. जळगावात शिवसेनेचा पालकमंत्रीच गायब झाल्याने आज ही उद्धव ठाकरेंचा फोटो हात घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. जळगावातील महापौर जयश्री महाजन यांनाही अश्रू अनावर झालेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना एक कुटुंब आहे , गेलेल्या आमदारांनी परत स्वगृही परत यावे अशी सार्थ हाक आज या शिवसैनिकांनी दिली.

राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ भाजपने विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे आमदार निवडून आणले. त्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २१ जूनला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं राजकीय बंड समोर आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतल्या आमदारांचा एक मोठा गट नॉट रिचेबल झाला. ते सगळे आमदार सुरतला असल्याचं कळलं. त्यानंतर हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही फेसबुक लाईव्ह करून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्राशी संवाद साधला

हे वाचलं का?

    follow whatsapp