कन्नड भाषिक सोलापूर, अक्कलकोटनेही कर्नाटकमध्ये यावं : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला नव्याने सुरुवात झाली. अशातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोम्मईंनी ट्विट करुन सोलापूर आणि अक्कलकोट या शहरांवरही कर्नाटकचा दावा असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी बेळगावसाठीही कधी यश येणार नसल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाले बसवराज बोम्मई : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, […]
ADVERTISEMENT

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला नव्याने सुरुवात झाली. अशातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोम्मईंनी ट्विट करुन सोलापूर आणि अक्कलकोट या शहरांवरही कर्नाटकचा दावा असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी बेळगावसाठीही कधी यश येणार नसल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले बसवराज बोम्मई :
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.
कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनीच कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे.
2004 पासून महाराष्ट्र सरकारनं सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. पण आतापर्यंत याला यश आले नाही आणि यापुढे ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.