'अर्धनग्न वस्त्र घालून इकडे-तिकडे फिरणं ही...', Karuna Munde संतापल्या

Karuna Munde on Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर बरीच टीका केली आहे. ज्यानंतर आता करुणा मुंडे यांनीही तिला टार्गेट केलं आहे.
करुणा मुंडेनी उर्फीवर केली तुफान टीका
करुणा मुंडेनी उर्फीवर केली तुफान टीका

Karuna Munde targeted Urfi Javed: मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या कपड्यांवरुन सध्या चांगलंच राजकारण रंगलं आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर उर्फीनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं आहे. असं असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या देखील या प्रकरणात चर्चेत आल्या आहेत.. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये करुणा मुंडेंनीही (Karuna Munde) उडी घेतली आहे. जाणून घेऊयात करुणा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या? (karuna munde criticizes urfi javed supports bjp leader chitra waghs stand)

उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी टीका केली. दोघींमध्ये वाद वाढला. त्यात चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ओढलं. त्यानंतर चाकणकर आणि वाघ यांच्यात वाद सुरू झाला. चाकणकरांनी वाघ यांना थेट नोटीस पाठवली. हा वाद सुरू असतानाच सुषमा अंधारेंनी यात उडी घेत अमृता फडणवीसांवर निशाणा साधला.

करुणा मुंडेनी उर्फीवर केली तुफान टीका
Urfi Javed : 'म्हणूनच उर्फी पूर्ण कपडे घालत नाही'... अखेर कारण आलं समोर

तीन-चार महिलांनंतर करुणा मुंडेंनीही या प्रकरणात उडी घेतली. त्या म्हणाल्या, 'आज उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद सुरू आहे. मी देखील तिच्या कपड्यांना विरोध करते. अर्धनग्न वस्त्र घालून इकडे-तिकडे फिरणं ही सर्वच महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या महिला राजकारणी उर्फीला पाठिंबा देत आहेत त्यांना मी सांगते, तुम्हाला लाज वाटली पाहिजे...तुम्ही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहात.'

करुणा मुंडेनी उर्फीवर केली तुफान टीका
उर्फी अडल्ट स्टार बनतेय? नवा Video पाहून यूजर्स म्हणाले...

'ज्या-ज्या महिला उर्फीच्या मताशी सहमत आहेत त्या सर्व बिनडोक आहेत.' असं म्हणत करुण मुंडे चित्रा वाघांच्या मदतीला धावल्या आहेत. तसेच त्यांनी रुपाली चाकणकर, सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

आता या प्रकरणी करुणा मुंडे यांना रुपाली चाकणकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण हे प्रकरण इथेच शांत होईल असं चित्र सध्या तरी दिसत नाही.

त्यामुळे आता हे प्रकरण पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. उर्फी जावेदचे कपडे आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in