Kolhapur : “भ्याल रे भ्याल महाडिक भ्याल…” : सव्वा लाख कागदपत्रांसह सतेज पाटील मैदानात
कोल्हापूरला पुन्हा एकदा काँग्रेस नेते सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबीय असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

Satej Patil Vs Dhananjay Mahadik :
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरला पुन्हा एकदा काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध महाडिक कुटुंबीय (Mahadik Family) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नुकतंच या निवडणुकीमध्ये पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर आता पाटील गटाने आक्रमक होतं 29 उमेदवार पात्र असल्याबाबतचे 1 लाख 30 हजार कागदपत्र प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सादर केले. यावेळी “भ्याल रे भ्याल महाडिक भ्याल…” अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. मात्र यामुळे पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष तीव्र झाल्याचं चित्र आहे. (Kolhapur Politics | Congress leader Satej Patil vs Mahadik family)
श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत आमदार सतेज पाटील गटाचे २९ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. याला पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं. “आज रडीचा डाव खेळला. चांगलं केलं, मी 14 तास राबणार होतो. आता 24 तास राबणार. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे. हा कोणा एकट्याच्या मालकीचा होता काम नये. ही बंटी पाटील आणि 12 हजार सभासदांची भूमिका आहे, असं म्हणतं महाडिक यांना पाटील यांनी आव्हान दिलं.
हेही वाचा : नाशिक : काळाराम मंदिरात संयोगिता राजेंसोबत घडला धक्कादायक प्रकार
त्यानंतर आता 29 उमेदवार पात्र असल्याबाबतचे 1 लाख 30 हजार कागदपत्र आमदार सतेज पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्याकडे सादर केली. यावेळी सतेज पाटील म्हणाले, प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. जर न्याय मिळाला नाही तर कारखान्याचे एमडी आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी “भ्याल रे भ्याल महाडिक भ्याल… अशा घोषणांनी साखर सहसंचालक कार्यालय परिसर दणाणून सोडला.