
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबादेत सभा घेतली. औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी असल्याचा आरोप करत त्यांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न राज यांनी केला.
औरंगाबादेतील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची ही सभा पार पडली. पोलिसांनी आधीच नियम घालून दिलेले असल्यानं राज ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या सभेत राज ठाकरे हे पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन, हिंदू, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देताना दिसले.
त्याचबरोबर ३ मे पर्यंत दिलेल्या अल्टिमेटमची आठवण त्यांनी करून दिली. मशिदींवरील भोंगे उतरलेच पाहिजे असं म्हणतानाच त्यांनी भोंग्यांवरून अजान सुरू झाल्यानंतर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन या सभेत केलं.
राज ठाकरे काय बोलले? हे ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ बघा....