Eknath Shinde: 'तोंड दाखवायला जागा राहणार नाही, सगळंच बाहेर काढेन', शिंदेंचा ठाकरेंना इशारा

रोहिणी ठोंबरे

CM Eknath Shinde On Aaditya Thackeray Allegation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंना थेट इशारा देत म्हटलं आहे की, 'लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही.' शिंदेंच्या या वक्तव्यानंतर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण बाळासाहेबांची..."

point

"शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं", ठाकरेंचा आरोप, मुख्यमंत्री काय म्हणाले?

point

"मोदी द्वेषाने पछाडलेले लोक, जनता यांचा बंदोबस्त करेल" 

CM Eknath Shinde On Aaditya Thackeray Allegation : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू असून राजकारणही तापले आहे. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. अशात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. 'लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्रे आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व बाहेर काढेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही', असा इशारा शिंदेंनी ठाकरेंना दिला. (London to Lucknow There are all the documents of Thackeray's case Follow the limits or I will expose everything CM Eknath Shinde Speaks on Aaditya Thackeray allegations)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मंगळवारी (23 एप्रिल) मावळ येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. 'एकनाथ शिंदे यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती', असे आदित्य ठाकरे म्हणाले. याला सणसणीत उत्तर देताना शिंदेंनी खिल्ली उडवली. 

हेही वाचा: "...आणि शिव्या आम्हाला घालता?", पवारांनी सभेत लावलं मोदींचं 'ते' भाषण

"पोराटोरांवर मी बोलत नाही"

"सत्ता गेल्यानंतर लोक वेडेपिसे झालेत, त्यामुळे त्यांचं संतुलन पण बिघडलेलं आहे. पोराटोरांवर तर मी बोलत नाही. त्यांचं वय किती, त्यांना कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती? आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले, रक्ताचं पाणी केलेले लोक, पाया पडून घेणं हे काय आहे? लोकांना ते आवडत नाही. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु हे सरमजारदार, संरमजारशाहीने वागणारे लोक आपल्या लोकांना घरगडी, नोकर समजतात आणि यामुळेच तर हा सर्व इतिहास घडला आहे", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

"सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण बाळासाहेबांची..."

"लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्रे आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही", असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp