एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

मुंबई तक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन एक आठवडा झाला आहे. अशात आता कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता कायम आहे. याच संदर्भात ही भेट घेतली गेली असण्याची शक्यता आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन एक आठवडा झाला आहे. अशात आता कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता कायम आहे. याच संदर्भात ही भेट घेतली गेली असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर त्यांच्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार गेले तसंच त्यांच्यासोबत १२ अपक्ष आमदारही गेले आहेत. या सगळ्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तसंच उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

भाजपचे ११५ आमदार आणि शिवसेनेच्या गटासोबत आलेले १२ आमदार असं ५२ आमदारांचं बळ शिंदे फडणवीस सरकारमागे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं वाटलं होतं. मात्र धक्कातंत्राच्या वापर करत हे नाव जाहीर करण्यात आलं. तसंच त्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील हे देखील पक्षाने जाहीर केलं. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांना काय मिळणार? तसंच भाजपच्या आमदारांना काय मिळणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp