Maharashtra Political Crisis: शिंदेंनी शिवसेना फोडली अन्.. बंडानंतर आजवर काय-काय घडलं?

मुंबई तक

Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. पाहा गेल्या 10 महिन्यात सत्तेसाठी नेमकं काय-काय घडलंय.

ADVERTISEMENT

maharashtra political crisis after eknath shindes rebellion what has happened in the power struggle in maharashtra so far
maharashtra political crisis after eknath shindes rebellion what has happened in the power struggle in maharashtra so far
Google CTA

Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: महाराष्ट्रात जून 2022 पासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्याचा नवा अंक सुरू होणार आहे. कारण सुप्रीम कोर्ट या संपूर्ण प्रकरणावर उद्या अंतिम निकाल देणार आहे. अशावेळी राज्याचं अवघं राजकारणच बदलून जाईल. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) काही आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) यांच्यात न्यायलयीन पातळीवर मोठा संघर्ष सुरु आहे. ज्याचा एक अंक उद्या संपणार आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा सत्तेच्या महानाट्यावर पडदा पडणार की, नव्या अंकाला सुरुवात होणार हे आता अवघ्या काही तासातच कळणार आहे. याच सगळ्या सत्तासंघर्षाची नेमकी टाइमलाइन आपण टाकूयात एक नजर. (maharashtra political crisis after eknath shindes rebellion what has happened in the power struggle in maharashtra so far)

सत्तासंघर्ष: 20 जून 2022 ते 10 मे 2023 नेमकं काय-काय घडलं

  • 20 जून 2022:

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह महाराष्ट्र सोडत थेट भाजपशासित गुजरात राज्यातील सुरत गाठलं

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी शिवसेनेचे आणखी 10 ते 12 आमदार या बैठकीला गैरहजर होते.

  • 21 जून 2022

बंडाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी युती तोडण्यास सांगितलं. तसेच भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती.