Maharashtra Political Crisis : शिंदेंनी सांगितलं ‘त्या’ 15 दिवसांत काय काय झालं?
सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली. सरन्यायाधीशांनी कौल यांना युक्तिवाद संपवायला सांगितलं. आपल्याला हा युक्तिवाद होळीच्या सुट्टीनंतरही सुरू ठेवायचा नाही असं सरन्यायाधीशांनी कौल यांना सांगितलं. आम्हांला मविआसोबत जायचं नव्हतं कारण आमची विचारधारा वेगळी आहे. दोन बैठकांना आम्ही अनुपस्थित होतो याचाच ठाकरे गट मुद्दा करतायत. शिवसेना सरकार बनवू शकणार नाही असं आम्ही कधीच म्हणालो नव्हतो. पक्षांतर्गत गोष्टींशी […]
ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली. सरन्यायाधीशांनी कौल यांना युक्तिवाद संपवायला सांगितलं. आपल्याला हा युक्तिवाद होळीच्या सुट्टीनंतरही सुरू ठेवायचा नाही असं सरन्यायाधीशांनी कौल यांना सांगितलं.
आम्हांला मविआसोबत जायचं नव्हतं कारण आमची विचारधारा वेगळी आहे. दोन बैठकांना आम्ही अनुपस्थित होतो याचाच ठाकरे गट मुद्दा करतायत. शिवसेना सरकार बनवू शकणार नाही असं आम्ही कधीच म्हणालो नव्हतो. पक्षांतर्गत गोष्टींशी अध्यक्षांचं देणंघेणं नसतं.
21 जूनच्या बैठकीची गैरहजेरी हे अपात्रतेचं कारण सांगण्यात आलं. येडियुरप्पा प्रकरणात अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं. बहुमत आणि व्हीप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा. पण इथे दोन व्हीप आहेत, मग बहुमताच्या व्हीपचा विचार करण्यात यायला हवा का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. अध्यक्षांना केवळ बहुमताच्या बाजूनेच जावे लागेल का? तुम्ही पक्षावर दावा केल्यास अध्यक्षांनी कोणाचं बहुमत पाहावं? सरन्यायाधीशांचा पुन्हा सवाल.
बहुमत चाचणी ही लोकशाहीसाठी मुलभूत गोष्ट : कौल