भाजपचं दबावतंत्र! एकनाथ शिंदेंनी घेतली तातडीची बैठक, काय ठरली रणनीती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra political news : what is Shiv Sena stratagy against bjp, eknath shinde meeting with party leaders
Maharashtra political news : what is Shiv Sena stratagy against bjp, eknath shinde meeting with party leaders
social share
google news

Eknath Shinde Shiv Sena : लोकप्रियतेत देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदेंच नंबर वन आहेत, अशी जाहिरात करून शिवसेनेनं स्वः अस्तित्व दाखवलं. आणि भाजपकडून सुरु असलेल्या दबाबतंत्राला उत्तर देण्यासाठी आता शिवसेनेनं आणखी आक्रमक होण्याचा प्लॅन आखलाय. शिंदेंच्या सेनेनं जशास तसं उत्तर देण्याचा हा प्लॅन ठरला वर्षा बंगल्यावर! शिंदे आणि कीर्तीकरांनी आमदारांना कानमंत्र देण्यात आला. आमदारांना काय सांगण्यात आलं, भाजपला भिडण्याचा प्लॅन काय आणि यातून शिंदेंना साधायचं काय? हेच समजून घेऊ…

एकनाथ शिंदेंचं सरकार येऊन वर्ष होत नाही, तोच भाजप आणि शिवसेनेतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्यात. भाजप नेत्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यावरच दावा ठोकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठीही एकनाथ शिंदेंवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?

याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे सोमवारी 12 जूनला काश्मीर दौऱ्यावरून मुंबईत परतले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच शिवसेना नेते, मंत्री, आमदारांची वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बैठकीत काय झालं?

याच बैठकीत फाटाफुटीनंतरचा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन कसा साजरा करायचा? निवडणुकांना सामोरं कसं जायचं, याबद्दलचा प्लॅन ठरला. याचवेळी खासदार गजानन कीर्तीकरांनी शिंदेंसमोरच आमदारांना दिलेल्या कानमंत्राची खूप चर्चा आहे.

हेही वाचा >> “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?

शिवसेना बैठकीला उपस्थित असलेल्या सुत्रांनी मुंबई Takला दिलेल्या माहितीनुसार, कीर्तीकरांनी शिवसेनेच्या आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या वाढत्या दबावतंत्रावर सूचक भाष्य केलं. शिंदेंसोबत 40 आमदार एकत्र आले, म्हणून आज भाजप सत्तेत आली. त्यामुळे 40 आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं आहे. 40 आमदार सोबत होते म्हणून महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. उद्धव ठाकरेंना पायउतार केलं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. 40 आमदार सोबत असले की काय होऊ शकतं याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र आणि ताकदीनं राहिलं पाहिजे, असं कीर्तीकर आमदारांना म्हणाले.

ADVERTISEMENT

कीर्तीकरांचा आमदारांना सूचक संदेश

काही दिवसांपूर्वीच एका भाजप एका नेत्याने आमच्यामुळेच आज शिंदे मुख्यमंत्री असल्याचा दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर 40 आमदारांमुळेच भाजप पुन्हा सत्तेत आल्याचं हे विधान समोर आलंय. एकप्रकारे कीर्तीकरांनी भाजपला जशास तसं उत्तर देण्यासाठी 40 आमदारांनीही आपली ताकद ओळखावी, असा सूचक संदेश दिला. मात्र थेट शिंदे पितापुत्रांनाच बालेकिल्ल्यात चॅलेंज मिळाल्यानं आमदार किती एकवटतात आणि ताकद दाखवतात हे बघणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?

एका सर्वेमध्ये देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदे अधिक लोकप्रिय आहेत, असं समोर आलं. याचाच दाखला देत शिवसेनेनं शिंदेंच नंबर वन असल्याची जाहिरात केली. त्याचवेळी शिंदेंच्या बैठकीतला कीर्तीकरांचा हा कानमंत्र समोर आलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT