‘आम्हाला 20 ते 25 आमदारांचा छुपा पाठिंबा’, राऊतांना सल्ला देताना बावनकुळेंचं विधान
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय परिस्थिती गोंधळलेली. कधी काय होईल, याचा नेम नाही.’ दानवेंच्या याच विधानावर खासदार संजय राऊतांनी बोट ठेवत शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार असा दावा केला. या विधानांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना सल्ला दिलाय. सल्ला देतानाच बावनकुळे असंही म्हणाले की, आम्हाला 20 त 25 आमदारांचा छुपा पाठिंबा आहे.’ रावसाहेब […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय परिस्थिती गोंधळलेली. कधी काय होईल, याचा नेम नाही.’ दानवेंच्या याच विधानावर खासदार संजय राऊतांनी बोट ठेवत शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार असा दावा केला. या विधानांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना सल्ला दिलाय. सल्ला देतानाच बावनकुळे असंही म्हणाले की, आम्हाला 20 त 25 आमदारांचा छुपा पाठिंबा आहे.’
रावसाहेब दानवेंच्या विधानाने मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेसह राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना तोंड फुटलंय. दानवेंनी एका कार्यक्रमात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले. संजय राऊतांनीही दावा केलाय की शिंदे-फडणवीस यांचं सरकार जाणार.
या सगळ्या राजकीय गदारोळावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भूमिका मांडलीये. नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘कधी वाटलं होतं का की महाविकास आघाडी सरकार पडेल? मात्र, आमचं हे सरकार पूर्ण वेळ चालणार. सरकार मजबूत आहे. आता आमदारांची संख्या 164 आहे. पुढे 184 पर्यंत जाईल. संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत.”
राज्यात मध्यावधी निवडणुका?; उद्धव ठाकरेंनंतर रावसाहेब दानवेंचं मोठं विधान