अभिनेत्री केतकी चितळेची विकृत पोस्ट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar Reaction on Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विकृत पोस्ट प्रकरणी तिला ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्यात प्रकरणात आता शरद पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेची विकृत पोस्ट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
marathi actress Ketaki Chitale perverted post ncp chief sharad pawar reaction

नांदेड: अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबतची एक विकृत कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता याच सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार हे आज (14 मे) नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांना केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टबाबत विचारणा करण्यात आली. त्याबाबत पवारांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

'ही नेमकी व्यक्ती कोण आहे हे मला माहित नाही.' असं म्हणत शरद पवार यांनी केतकी चितळेच्या या प्रकरणाला फारसं महत्त्व दिलेलं नाही.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

'मला ठावूक नाही... ही कोण व्यक्ती आहे ते देखील मला माहिती नाही. तुम्ही सांगता ते प्रकरण मला माहित नाही.'

'नेमकं काय केलंय त्यांनी हे माहित नसेल तर त्यावर भाष्य करणं योग्य नाही. हल्ली दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका मराठवाड्यातील एका कविच्या काव्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे काही लोकांनी त्याचं वेगळं चित्र मांडलं. जे वास्तव नव्हतं. एवढा एकच भाग.' असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणावर फारसं भाष्य केलेलं नाही.

अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी विकृत पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोलीतून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर तिला कळवा या ठिकाणी आणलं जाणार आहे.

शुक्रवारी रात्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केली. या पोस्टमध्ये शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली. त्यानंतर आता केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे.

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

marathi actress Ketaki Chitale perverted post ncp chief sharad pawar reaction
केतकी चितळेवर राज ठाकरे प्रचंड संतापले, म्हणाले...

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट

"तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

ही कविता केतकीने पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. तसंच गुन्हाही दाखल झाला. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

Related Stories

No stories found.