चंद्रकांत पाटील उद्विग्न : पुन्हा एकदा माफीचं पत्र अन् टिकाकारांना कळकळीची विनंती

मुंबई तक

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्विग्न होत सविस्तर पत्र लिहून वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. तसंच शाईफेक करणारा संबंधित व्यक्ती, निलंबित ११ पोलीस, पत्रकार यांच्याबद्दल आपली काहीही तक्रार नसून या वादावर आपल्याबाजूने पडदा पडला असून इतरांनीही हा वाद थांबवावा अशी विनंती केली आहे. काय म्हणाले चंद्रकांत पाटील : जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्विग्न होत सविस्तर पत्र लिहून वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. तसंच शाईफेक करणारा संबंधित व्यक्ती, निलंबित ११ पोलीस, पत्रकार यांच्याबद्दल आपली काहीही तक्रार नसून या वादावर आपल्याबाजूने पडदा पडला असून इतरांनीही हा वाद थांबवावा अशी विनंती केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील :

जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.

मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp