Uday Samant : प्रकल्प नेमके कोणामुळे गेले? माजी न्यायाधीशांची समिती करणार चौकशी

मुंबई तक

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आरोपांना माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून उत्तर देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. ही तीन सदस्यांची समिती असून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सामंत म्हणाले, काल झालेली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि विरोधकांच्या आरोपांना माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून उत्तर देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. ही तीन सदस्यांची समिती असून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सामंत म्हणाले, काल झालेली पत्रकार परिषद ही केवळ राजकीय होती. मागील ३ महिन्यांपासून प्रकल्प येत नाहीत असं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण माहिती अधिकारात सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. तरीही पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. सिनार्मस या प्रकल्पाचा करार दावोसला झाला असा दावा त्यांनी केला. त्यात कुठलंही दुमत नाही. मात्र करार झाला म्हणजे उद्योग आला असे होत नाही. काल त्यांना जमीन वाटप देकार पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दिले.

वेदांता-फॉक्सकॉनबाबत काय म्हणाले उदय सामंत?

यावेळी आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या वेदांताबाबतच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी काही तारखा आणि बैठका याविषयी माहिती दिली. तसंच आदित्य ठाकरे यांनी ज्याप्रमाणे एमआयडीसीचं पत्र सादर केलं, त्याच प्रमाणे सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं एक पत्र समोर आणलं.

सामंत म्हणाले, २४ मे २०२२ रोजी वेदांतासंदर्भात दावोसमध्ये एक बैठक झाली होती. त्यानंतर जूनमध्ये दिल्लीतही बैठक झाली, पण या दोन्ही बैठकांचा इतिवृत्त आपल्याकडे नाही. हायपॉवर कमिटीची स्थापना झाली नव्हती. १४ जुलै २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताच्या अनिल अग्रवाल यांना एक पत्र दिले. त्यानंतर १५ जुलैला हायपावर कमिटीची स्थापना झाली. त्यांनी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp