Mumbai Tak /बातम्या / Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?
बातम्या राजकीय आखाडा शहर-खबरबात

Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?

MLA Bachchu Kadu: नाशिकः प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक (Nashik) येथे आले होते त्यानंतर त्यांनी नाशिकमधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) दोन एकर कांदा पिकावर मागच्या काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता. त्या शेतकऱ्याची आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली. पण यावेळी शेतकऱ्याने एक असं वाक्य म्हटलं की, ज्याने बच्चू कडूंसह सर्वच अवाक् झाले. ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. या गद्दारांबरोबर जायला नको होतं. भाऊ, विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष, कांदा उत्पादकांना न्याय द्या.’ असं विधान शेतकऱ्याने यावेळी केली. mla bachchu kadu you should not have gone with the traitors farmer directly told in nashik

कांद्याला मिळत असलेला कमी भाव व झालेला खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संतापून कांदा उत्पादक शेतकरी अनिल बोरगुडे यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी आपल्या दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरविला होता. त्यानंतर या शेतकऱ्याच्या शेतीला आमदार रोहित पवार, आमदार दिलीपराव बनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या शेतकऱ्यांशी व कुटुंबाशी संवाद साधला होता.

आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नैताळे येथे रात्री भेट दिली. या भेटीत कांदा पिकावर रोटर फिरविलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार बच्चू कडू यांनी सवांद साधताना विद्यमान सरकारची पाठराखणत केली.

शेतकरी आपल्या पिकांना हमी भाव न मागता मजुरी म्हणून अनुदान मागू शकता असे ते म्हणाले. ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात. शेतकरी, कष्टकरी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतो. तुम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. पण तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं विधान यावेळी काही शेतकऱ्यांनी केलं.

दरम्यान, शेतकऱ्याने असं म्हटल्यानंतर आपली बाजू सावरण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी त्या शेतकऱ्याला स्थानिक ग्रामपंचायतीचे उदाहारण देऊन वेळ मारुन नेली.

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले, त्यांच्यावर आरोप…”

याआधी देखील बच्चू कडू यांना 50 खोक्यांवरून मतदारसंघातील काही नागरिकांनी बरंच सुनावलं होतं. असं असताना आता पुन्हा एकदा गद्दारांवरुन टिप्पणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत बच्चू कडू भविष्यात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बच्चू कडू आक्रमक होताच मिळालं फळ! शिंदे-फडणवीसांनी मंजूर केला ५०० कोटींचा प्रकल्प

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडू यांना राज्यमंत्री पद दिलं होतं. मात्र, असं असताना देखील बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडात पहिल्या दिवसापासून सामील झाले होते. सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहटीला गेलेल्या बच्चू कडू यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये बच्चू कडू यांना अजिबात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मोठी निराशा झाली. मात्र, अद्यापही बच्चू कडू हे सध्याच्या सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळत आहे.

‘सरकार पडलं तरी बेहत्तर पण…’ : बच्चू कडू गुवाहटीत कामाख्या देवीला मागणार आशीर्वाद

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…